किनवट तालुका/प्रतिनिधी
किनवट : तालुक्यातील आप्पाराव पेठ येथील गोरक्षक शेखर रापेल्लीच्या खून प्रकरणातील फरार आरोपींपैकी पाच आरोपींना तेलंगणा राज्यातुन तळ ठोकून बसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने निर्मल जिल्ह्यातून अटक केली आहे.
किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ मार्गावरील एका पुलावर गोरक्षक शेखर रापेल्ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका संशयित वाहनाची चौकशी केली. त्यावेळी सदर वाहनासह अन्य एका वाहनातून आलेल्या १२ ते १५ जणांनी गोरक्षकांवर जिवघेणा हल्ला केला. यात शेखर रापेल्लीचा मृत्यू झाला तर अन्य सहा जण जखमी झाले. याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास अधिकारी किनवटचे पोलिस उपअधिक्षक विजय डोंगरे यांनी २३ जून रोजीशेखर रापेल्लीचा खून करणारे आरोपी शेख इसाक चाँद साब, मुजाहिद उर्फ मुज्जू शेख इसाक शेख मुज्जमीर उर्फ मुज्जू शेख फय्याज यांच्यासह चौथा आरोपी शेख अमीर शेख अलीम सर्व रा. आण्णारावपेठ ता. किनवट यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. तर उर्वरित फरा आरोपींचा तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यासह वेगवेगळ्या भागात शोध घेतला जात आहे. हे आरोपी शोधण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी स्विकारली. २० जूनपासून ते स्वतः आणि त्यांचे सहकारी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तेलंगणा राज्यात तळ ठोकून आहेत. अखेर रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातून फरार आरोपीपैकी मुख्तारकुरेशी अहेमद कुरेशी (३०), शेख सलीम गोरे मियाँ (३०), शेख सलाम शेख अलीम (३२), शेख फजल्लोदिन शेख बगीरोद्दीन (३५), शेख फेरोज शेख चाँदसाब (३४) सर्व रा. अप्पारावपेठ यांना ताब्यात घेतले पुढील कार्यवाहीसाठी या सर्वांची रवानगी इस्लापूर पोलिस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या पथकात कामगिरीबद्दल विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. शशिकांत महावरकर, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोउपनि सचिन , सोनवणे, सपोनि संजय केंद्रे, गंगाधर कदम, रुपेश , , दासरवाड, संभाजी मुंडे, राजू पुलेवार, मोतीराम पवार, देवा चव्हाण, गुंडेराव करले, सुरेश घुगे, संजीव जिंकला याचा समावेश होता.