लंपिस्कीन आजारांवर खाजगी ऊपचार करू नये.पशू मृत्यू मुखी पडल्यास त्याला प्रशासन जबाबदार नसेल! – पशू वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश सोनटक्के 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हिमायतनगर ता.प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर : सध्या पावशाळाचा दिवस चालू आसून हिमायतनगर तालुक्यातील सर्वत्र जनावरांना लंपीस्कीन आजार वाढत आहे. लंपीस्कीन आजाराचे लक्षण दिसताच क्षणी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील पशू वैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा,आसे आव्हान हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ उमेश सोनटक्के यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सूचना केल्या आहेत.
लंपीस्कीन आजार वाढत आसूंन आपल्या जनावरांना लक्षण दिसत आसल्यास कोठल्याही खाजगी ऊपचार करून आपल्या पशूंना आजार वाढून घेऊ नये.लंपीस्कीन आजाराने जनावर दगावल्यास त्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी त्या जनावरांची पशू वैद्यकीय केंद्रात नोंद आसायला हवी.तशी नोंद आसेलतर शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आडचण येणार नाही.अन्यथा अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
आसे आव्हान हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ उमेश सोनटक्के यांनी लोकतंत्र न्युज लाईव्ह ला प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!