माक्रो फायनान्स कंपन्या कडून भारतीय संविधानाचा जाणीवपूर्वक अवमान
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीव कुमार गायकवाड
नांदेड १.मे हा दिवस खरंतर भारतात कामगार दिन म्हणून पाळला जात असतांना दुसरी कडे प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षा मुळे माक्रोफाइनास कंपन्या व फाइनास इंडस्ट्रिअल कंपनी मधील देशातून हेंद्राबाद,चेन्नई,बेंगलोर,महाराष्ट्र ओडिसा,येथून फाइनास कंपनीचा कारभार करणाऱ्या मोठ मोठया माक्रोफायनान्स कंपनीनां महाराष्ट्र कामगार दिना च्या महाराष्टातील लाखो कामगारांना आज रोजी सुट्टी देण्याचा विसर पडला असून या वर वित्त विभागाच्या प्रमुखचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
वरील कंपन्या आपल्या कामगारांचे हक्क हिरावून घेत असून सुद्धा महाराष्ट्र सरकारचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कामगारांना बिर्टीश काळात जशी बेडबिगारी कामगारांना १८ घंटे काम करून घेण्यात येत असे तसेच माक्रोफायनान्स कंपन्या आपल्या कर्मचाऱ्या कडून काम करून घेताना दिसत आहेत.
महाराष्ट्र शासनाने वेळीच अश्या कंपन्यावर निर्बंध लादले नाही तर एक दिवस कामगारांचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही. या कंपन्या यात गावागावातील पेश्या ची गरज असणाऱ्या महिलानां एका गटत रूपांतर करून एकमेकांच्या हमी घेऊन गट उचलले जातात त्यात गरजूवनंतना रोज, आठवड्याला, पंधरावाडा,महिन्याला घेतलेल्या पेश्या वर २६% व्याज लावून ह्या कंपण्या वसुल करीत असतात जे की गावातील सावकारीला सुद्धा लाजवेल अशी ही पद्धत केंद्र शासनाकडून परवानगी घेऊन दिवसा ढवळ्या गोरगरीब जनतेला लुटण्याची परवानगी देते पण आज महाराष्ट्र राज्यात मध्ये १ मे दिवशी कामगार दिवस म्हणून पाळला जातो या दिवशी कोणत्याच कामगारांना काम करू दिले जात नाही.पण कामगार संघटना नी देखील या बाबी कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.
कामगार दिनी सर्व प्रकारच्या कामगारांना भर पगारी सुट्टी देऊन त्यांचा सन्मान केला जातो पण या माक्रोफायनान्स कंपण्यानां भारताचे संविधान मान्य नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून अश्या कंपन्याची चोकशी करून फायनान्स मिनिस्टरी केंद्र शासनाने यांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी कामगारां कडून होताना दिसत आहे.