शिवाजी जाधव जामनेर प्रतिनिधि
जामनेर : तालुक्यातील तळेगाव येथून सुमारे ८० ते ९० विद्यार्थी जामनेरला सकाळी शिक्षणा साठी ये जा करीत असतात यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असून सकाळी सात वाजेच्या सुमारास हे विद्यार्थी बस स्थानकावर असतात आणि नेमक्या यावेळेस दोन बस आहेत एक आमखेडा वरून येते तर दुसरी गोद्री फत्तेपूरवरनं येते मात्र या दोघी बस विद्यार्थ्यांनी व प्रवाशांनी अगोदर भरलेल्या असतात. त्यामुळे तळेगाव शेळगाव येथील विद्यार्थ्यांना या बस मध्ये बसता येत नाही थोडेफार विद्यार्थी बसतात व बाकीचे खाली राहून जातात मग या विद्यार्थ्यांना ३ किलोमीटर शहापूर पर्यंत पायी जाऊन बस मध्ये बसावे लागते .असा रोजचा त्रास विद्यार्थ्यांकडून असह्य झाल्याने विद्यार्थ्यांनी जोपर्यंत बस सुरू होत नाही व विद्यार्थ्यांना घ्यायला बस येत नाही तोपर्यंत येणाऱ्या बसेस या जाऊ देत नाही असा पवित्रा घेतला. यावेळी बस अडवून ठेवण्यात आल्या यावेळी तळेगावच्या सरपंच आरती कोळी यांनी आगारप्रमुख धनराळे यांच्याशी संपर्क साधला व विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तसेच याच वेळे त माजी सभापती पंचायत समिती जामनेर नवल पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले व त्यांनी देखील विद्यार्थ्यांशी चर्चा करून ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला व विद्यार्थ्यांची थेट बोलणे करून दिले यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे कुठलीही गैरसोय होऊ देणार नाही व आगर प्रमुखांना उद्यापासून बस सुरू करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या उद्यापासून तळेगाव येथे नियमित बस सुरू करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितलं. यानंतर आगार प्रमुखांशी संपर्क साधला असता धनराळे यांनी देखील त्वरित बस पाठवून विद्यार्थ्यांची व्यवस्था केली व उद्यापासून नियमित बस सुरू करतो असे सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील बस आल्याने आनंद व्यक्त केला व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तळेगावच्या सरपंच आरती कोळी शेळगाव सरपंच पती शिवसिंग राजपुत माजी सभापती नवलसिंग पाटील व आगार प्रमुख धनराळे यांचे आभार मानले.