अनुष्का राजकुमार मंगनाळे 93.6% घेऊन सीबीएससी परीक्षेत यश संपादन केलं.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेडआज सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला, आणि अनेक विद्यार्थी यशस्वी ठरले. या निकालाने शाळेला आणि पालकांना खूप आनंद झाला आहे,नागार्जुन पब्लिक स्कूल नांदेड या नामांकित शाळेतून अनुष्का राजकुमार मंगनाळे 93.60% घेऊन दहावी उत्तीर्ण करून यश संपादन केले. 

     अनुष्का मंगनाळे म्हणाली, “मी खूप आनंदी आहे की मी दहावी उत्तीर्ण झाली. माझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी मला खूप मदत केली. विशेषतः शाळेच्या प्राचार्या सौ. शैला पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष ठेवून दहावी परीक्षा कशा प्रकारे योग्य पद्धतीने सोडवाव्या यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांना योग्य सूचना व मार्गदर्शन करून आज शाळेची गुणवत्ता कायम ठेवण्यास त्या यशस्वी झाल्या त्याचबरोबर शाळेचे सचिव श्री केशव गड्डम सर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व भौतिक सुविधा परिपूर्ण करून देण्यास सदा अग्रेसर राहून, विद्यार्थ्यांना योग्य त्या व्यवस्था करून देण्यात व शिस्त पालन करण्यात मोलाचे सहकार्य केलं.”

     “मी कुठलीही शिकवणी न घेता सातत्यपूर्ण अभ्यास करून, माझ्या मेहनतीचे फळ आज मला मिळालं. मी आता अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार आहे.”या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे शाळेला आणि पालकांना खूप आनंद झाला आहे. त्यांच्या भविष्यासाठी शाळेतील प्राचार्य शैला पवार, सचिव केशव गड्डम, प्रदीप पवार, श्रीकांत गड्डम, दुर्गादेवी गड्डम, पत्रकार राजकुमार पाटील मंगनाळे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. अनुष्का मंगनाळे हिने नर्सरी ते दहावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्याचे ऋण व्यक्त केले.

Share This Article
error: Content is protected !!