सिख वेलफेअर एसोसिएशन तर्फे पत्रकार मोदी यांचा गौरव !
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड: सामाजिक कार्यकर्ता, साहित्यिक आणि पत्रकार म्हणून सरदार रविंद्रसिंघ मोदी यांनी समाजासाठी समर्पितपणे सेवा केली आहे.
त्यांना राष्ट्रीयस्तरीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद सर्वांना झाला आहे. असे उदगार गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि सिख वेलफेअर एसोसिएशनचे अध्यक्ष सरदार लड्डूसिंघ महाजन यांनी पत्रकार रविंद्रसिंघ मोदी यांच्या सत्कार कार्यक्रमात केली.शनिवार, दि. 19 जुलै रोजी सिख वेलफेयर एसोसिएशनचे कार्यालय स्व. हरीसिंघ महाजन नगर,नंदीग्राम सोसायटी येथे वरिष्ठ पत्रकार सरदार रविंद्रसिंघ मोदी यांचा अभिनन्दन व सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार लड्डूसिंघ महाजन होते.
नुकतेच रविंद्रसिंघ मोदी यांना दिल्ली येथील संस्था इंटरनेशनल इक्वीटेबल ह्यूमन राईट कौंसिल तर्फे नॅशनल इंटीग्रेशन एक्सेलेंस आवर्ड 2023 देऊन गौरव करण्यात होता.
सिख वेलफेयर एसोसिएशनने शीख समाजाचे पत्रकार,साहित्यिक आणि समाजसेवक अशा भूमिकेतुन मागील 30 वर्षापासून समाजाच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडल्या याची दखल घेत त्यांचे अभिनन्दन व सत्कार केले.
सरदार लड्डूसिंघ महाजन पुढे म्हणाले की, मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून रविंद्रसिंघ मोदी यांचा परिचय आहे.त्यांनी गुरुद्वारा बोर्डात अनेक वर्षें माझ्या सोबत काम ही केले आहे.
तसेच नांदेड जिल्ह्यातील एक प्रामाणिक पत्रकार म्हणून त्यांच्या आदराने उल्लेख होत असतो. त्यांना मिळालेला पुरस्कार हे त्यांच्या समर्पित कार्यांची पावती होय.
यावेळी प्राचार्य गुरुबचनसिंघ सिलेदार यांनी आपल्या भाषणात रविंद्रसिंघ मोदी यांच्या कार्यांचा आढावा घेतला.संस्थेचे सचिव सरदार नारायणसिंघ नंबरदार यांनी रविंद्रसिंघ मोदी यांच्या विविध सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्राशी निगडित कार्यांचा उल्लेख त्यांच्या संक्षिप्त भाषणात केला.
संस्थेतर्फे शाल,सिरेपाव आणि हार देऊन रविंद्रसिंघ मोदी यांचा गौरव आणि अभिनन्दन करण्यात आला.सत्काराला उत्तर देतांना पत्रकार रविंद्रसिंघ मोदी यांनी सिख वेलफेयर एसोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.तसेच समाजाच्या विविध प्रश्नावर पुढे लढा देऊ असे सांगत पत्रकारिता किंवा साहित्य सृजनाने स्थानीक शीख समाजाची सेवा करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.नांदेडच्या शीख समाजाच्या मागील मार्गक्रमणावर सविस्तर लिखाण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सिख वेलफेयर एसोसिएशनचे पदाधिकारी सरदार इंदरजीतसिंघ संधू,सरदार जीतसिंघ दुकानदार,सरदार लालसिंघ सपुरे,इंदरजीतसिंघ गडगज,हरभजनसिंघ वासरीकर, गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य स. गुरमीतसिंघ महाजन यांनी रविंद्रसिंघ मोदी यांचा सामूहिक सत्कार केला.