हिंगोलीतील निर्धार सभेत उद्धव ठाकरेंची जोरदार टोमणेबाजी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नाग समजून पूजा केली, पण तो डसला

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी

हिंगोली : ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिंगोली येथे जाहीर सभा घेतली. या सभेदरम्यान, उध्दव ठाकरे यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा टोमणेबाजी केली. शिंदे गटावर बोलताना ते म्हणाले, तुम्ही शिवसेना पक्ष, धनुष्यबाण आणि माझा बापसुद्धा चोरला असल्याचा पुनरुच्चार ठाकरेंनी यावेळी केला.

तसेच, उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता शेलक्या शब्दांत म्हणाले. आमच्या दाढीवाल्याने भाजपची पावडर लावली असून भाजपविरोधी मते फोडण्यासाठी येणाऱ्यांना ठाकरेंनी यावेळी इशारा दिला आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरे या जाहीर सभेत म्हणाले, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जसजसे दिवस जवळ येतील, तसे माझे दौरे वाढतील, असेही त्यांनी जाहीर केले. ते पुढे म्हणाले, नाग समजून पूजा केली, पण तो डसला असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचा पुनरुच्चार करतानाच आपण त्यांना फडतूस म्हणणार नाही, अशी टोमणेबाजी उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.

हिंगोली येथील निर्धार सभेत उध्दव ठाकरेंची टोमणेबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ठाकरे सभेत म्हणाले, ना स्वतःकडे विचार, ना आकार, ना उकार तर इंडियाला घमंडिया म्हटलं, तर तुम्ही एनडीए नव्हे घमेंडिए अशी टोमणेबाजी हिंगोलीच्या सभेत पाहायला मिळाली.

Share This Article
error: Content is protected !!