मुदखेड तालुका/ राहुल कोलते
मुदखेड दि.३० नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दिव्यांग सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तालुक्यातील महाटीचे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व्यंकटराव ढगे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. रेल्वेमध्ये जनसेवा करून सेवा निवृत्त झाल्यानंतर ही सामाजिक बांधिलकी जपून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असणारे व्यंकटराव पाटील ढगे यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकप्रिय लोकनेते मा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री मा.डी.पी.सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, सभापती संजय देशमुख लहानकर यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.