तालुका प्रतिनिधी/राहुल कोलते
मुदखेड तालुक्यातील बचत गटामध्ये प्रत्यक्षरीत्या गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ अशी परिस्थिती झालेली दिसून येते. मुदखेड तालुक्यातील कर्मचारी मनमानी कारभार करताना दिसून येतात. यांना तालुक्याचं काही देणे घेणे नाही. त्यांचा T.A.D.A.& KAR च देने घेणे आहे. तीन वर्षांमध्ये या कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील 54 गावांना किती वेळा भेटू दिल्या. कोणत्या गावांमध्ये काय चालू आहे हे विचारण्यासाठी सुद्धा बि.डि.ओ. सरांनाही वेळच उरलेला नाही. या माध्यमातून बि.डि.ओ. सरांना एकच विनंती आहे की तीन वर्षात त कोणत्या सीआरपी च किती मानधन आहे आणि त्यांचे काम हे पाहावे तुम्हाला समजून जाईल काय चालू आहे.तालुक्यातील काही मोजकेच गावा मध्ये शासकीय योजनेचा बचत गटाच्या माध्यमातून लाभ घेत आहेत. बाकीच्या गावांना बचत गटामार्फत कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ भेटत नाही किंवा त्यांना माहितीही दिली जात नाही. मानधनाचा विषय कोणाचेही मानधन त्यांच्या कामावरुन होत नाही काही मोजक्याच ICRP चे मानधन भरभरून होते तर काही ICRP चे तुटपुंजे असे होते हे फक्त त्यांचे तोंडे पाहुनच केले जाते काम पाहुण नाही. अशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठांना लेखी स्वरूपात देऊन सुद्धा त्यांच्यामध्ये तीळ मात्र फरक पडलेला नाही. मुदखेड तालुक्यातील ह्या अशा उद्धट बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्याचं पूर्ण वाटोळ झालेलं आहे. बऱ्याच गावामध्ये बचत गट ओस पडत आहेत (माळकौठा, शेंबोली, टाकळी, चिलपिंपरी, खुजडा, रोहीपिंपळगाव, वसंतवाडी, रोहिपिंपळगाव तांडा, दरेगाव, दरेगाव तांडा, दरेगाव वाडी, चिकाळा, देवापुर, पिंपळकोठा चोर,) या गावामध्ये जाऊन चौकशी करा बचत गटाची काय परिस्थिती आहे. हे समजून जाईल. या गावांना तालुक्याच्या कर्मचाऱ्यांची तोंड ओळख सुद्धा नाही. पगारी मात्र महिन्याला उचलतात.त्यांना कोणी विचारणारच नाही तुम्ही काय काम केलं म्हणून. त्यांचं खरंच आहे ते स्वतः तालुक्याचे बॉस आहेत त्यांना कोन विचारणार बरं. तालुक्यातील बचत गट व्यवस्थित चालवायचे असल्यास वरिष्ठांना विनंती आहे आशा कर्मचाऱ्यांना तालुक्यातून अगोदर हटवा नवीन कर्मचाऱ्यांची भरती करा अन्यथा मुदखेड तालुक्यात बचत गट बंद केले तरच व्यवस्थित राहील. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यामुळे तालुक्यातील कर्मचारी बे शिस्तीने वागत आहेत. आदरणीय राज्य व्यवस्थापक श्री. धुमाळे सर, प्रकल्प संचालक श्री. तुबाकले सर, जिल्हा व्यवस्थापक आदरणीय श्री पातेवार सर, राठोड सर, कवडेवार सर, भिसे सर, मुदखेड तालुक्यातील सर्वच सीआरपी चे तीन वर्षांचे कामे पहा कोणत्या गावात किती बचत गट तयार झालेत कोणत्या गावात झालेच नाहीत यांची चौकशी करा. त्याचबरोबर तीन वर्षात कोणकोणत्या सीआरपी चे मानधन किती किती झाले हे तपासा या कामाची जर चौकशी नाही झाल्यास मी राहुल कोलते पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता या सर्वांच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे यांची ताबडतोब चौकशी झालीच पाहिजे.