ढाणकी प्रतिनिधी/मनोज राहुलवाड
ढाणकी : गील कितेक दिवसांपासून चोरट्यानी धुमाकूळ घालून ४८ मोटरसायकल तसेच ०१ मोटार पंप असा एकूण २८,९७,००० रू मुद्देमाल चोरला गेला होता तो उघडकीस आला. मात्र एवढ्या धाडसी चोरी करून सुद्धा चोरटे मोकाटच होते. शेवटी त्याचा घडा भरला गेला. म्हणतात ना ‘कानून की हात बहुत लंबे हो ते है’ तसेच या चोरट्याच्या बाबतीत सुद्धा तसेच घडले. दि.३०/८/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोस्टे उमरखेड हद्दीत उघडकीस आलेले गुन्हें याबाबत गोपनीय माहिती द्वारे अशी माहिती मिळाली की, निलेश नारायण सूर्यवंशी राहणार वरवट ता हदगाव जी नांदेड यांने पुसद व उमरखेड शहरातील मोटारसायकली चोरल्याअसून त्या त्याच्या ताब्यात आहेत अशी माहिती मिळताच पथक तिथे पोहोचले व(१) निलेश नारायण सूर्यवंशी वय २९ वर्षे रा वरवट ता हदगाव यास ताब्यात घेतले व अधिक चौकशी केली असता नांदेड, परभणी ,वाशीम, हिंगोली या जिल्ह्यातून ३१ मोटरसायकल चोरी गेल्या चे उघड झाले व त्यात ढाणकी, हिमायतनगर येथील काही साथीदार असल्याचे उघड झाले. त्यात ढाणकी हिमायतनगर येथे काही साथीदार असल्याचे समजतात पोस्टाफ च्या मदतीने(२) सिद्धार्थ प्रभू काळबांडे २७वर्षे राहणार सावळेश्वर (३) अनिल सुभाष रावते वय २४वर्षे राहणार सावळेश्वर, राजीव नामदेव काळबांडे वय ३२ वर्ष सावळेश्वर, ओंकार रघुनाथ कत्तूलवाड ढाणकी हे चार आरोपी बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून परमेश्वर रंगराव डाके वय २४ वर्षे हा रा हिमायतनगर जिल्हा नांदेड यांना सर्वांना ताब्यात घेतले असता ४८ मोटरसायकल व ०१ मोटार पंप २८,९७,००० रुपये मुद्देमाल जप्त केलाअसून (१) पोस्टे वसंतनगर अ.प. क्र.२०१/२०२२ कलम ३७९(२) पोस्टे उमरखेड अप क्रमांक ५३३/२३ कलम ३७९(३) पो स्टे बिटरगाव अप क्र ३३९/२३ कलम ३७९ भादवी पो स्टे अंतर्गत गुन्हे दाखल केले गेले. हस्तगत केलेल्या मोटरसायकल ची माहिती घेणे सुरू असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरची कारवाई मा .पो अधीक्षक यवतमाळ डॉ श्री पवन बनसोड, मा.श्री. अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे.