मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलक उपोषणाला बसले होते..
जालना : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ही भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या वतीने सरकारचा निषेध करत मोर्चाही काढण्यात आला. यावर आता वंचितने देखील आपली भूमिका मांडलीय.
रयतेच्या मराठ्यांनी आता तरी शहाणे व्हा. निजामशाही, श्रीमंत सरंजमशाहीने आरक्षण मागितले म्हणून त्यांना झोडपून काढले. उच्च न्यायालयाने दिलेला घास निजामशाही, श्रीमंत सरंजामशाहीने काढून घेतला. आता तरी शहाणे व्हा. आतापर्यंत जातीसाठी माती खाल्ली. आता रयतेसाठी लढा. वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाचा फॉर्म्युला मांडला आहे. असं वंचितने म्हटले आहे.
दरम्यान, जालना येथे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गरीब मराठा आंदोलक उपोषणाला बसले होते. ह्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी निर्घृण लाठी हल्ला केला आहे. यामधे महिला आंदोलकांसह अनेकजण गंभिर जखमी झाले आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या आंदोलकांवर केलेल्या या लाठी हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी तीव्र निषेध करते. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. सरंजामी मराठा नेतृत्वाचा या आरक्षणाला विरोध असल्या मुळेच हा लाठीमार झाला आहे. लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या जालना व बीड येथे होणाऱ्या बंदला वंचित बहुजन आघाडी तर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे.
रयतेच्या मराठ्यांनी आता तरी शहाणे व्हा. निजामशाही, श्रीमंत सरंजमशाहीने आरक्षण मागितले म्हणून त्यांना झोडपून काढले. उच्च न्यायालयाने दिलेला घास निजामशाही, श्रीमंत सरंजामशाहीने काढून घेतला.
आता तरी शहाणे व्हा. आतापर्यंत जातीसाठी माती खाल्ली. आता रयतेसाठी लढा. वंचित बहुजन आघाडीने.