महाटी येथील रोहित्रामधिल ऑइल चोरी; वीज पुरवठा खंडित.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

मुदखेड प्रतिनिधी /राहुल कोलते

मुदखेड : महाटी गावातील पाणीपुरवठ्यासह शेतीला वीज पुरवणारे अशा दोन्ही रोहित्राच्या ऑइलची चोरी केली आहे. ऑइल नसल्याने त्यातील एका रोहित्राचा मोठा स्फोट झाला आहे.
महागाई व बेरोजगारीमुळे बुटालुट वाढणारी घरफोडी या सारखे चोरीचे अनेक प्रकार वाढले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यापासून ते अगदी फुटाणे विकणाऱ्या व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांनी चोऱ्यांची धास्ती घेतली आहे. हल्ली कमिशन पद्धतीने चोरीचे सत्र चालू आहे. दररोजच्या वर्तमानपत्रात विविध प्रकारच्या चोरीच्या ताज्या बातम्या वाचायला मिळतात परंतु वीज पुरवठा करणाऱ्या डीपीच्या ऑइल ची चोरी होते. महासत्ता हो पाहणाऱ्या देशाला महत्त्व काय असेल असं देखील प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
महाटी गावात सरपंच बिनविरोध आहे याचाच अर्थ असा गाव एकोप्याने नांदतं आहे. गावात महापुरुषांच्या शिकवणीची प्रेरणा असल्यामुळे गावातील मुख्य रस्त्यावरच नांदेडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळा सारखे प्रतिकृती साकारली आहे. गावालगतच गोदावरी व सीतानदी यांचा संगम असल्याने ऊस व फुल उत्पादक हे या गावचे मुख्य पिके आहेत. एकंदरीत सर्व जमीन सिंचनाखाली आहे. वीज पुरवठ्याची जोड म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीला वीज जोडण्यासाठी ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करण्यासाठी एकाच ठिकाणी दोन रोहित्राची व्यवस्था केली होती. मात्र दोन्ही रोहित्रा ऑइल चोरीला गेले असल्यामुळे एकच खळबळ उडाली. ऑइल नसल्याने त्या डीपी मधून चार-पाच दिवसापासून कोरडाच विज पुरवठा चालू असल्यामुळे एका रोहित्राचा बार झाला आहे. त्याचबरोबर विजेचा शॉप लागण्याची शक्यता आहे. पावसाअभावी पिके वाचल्याने शेती भिजवणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले आहे. पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे गावकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. ही बाब संबंधित विभागाला कळवली असता तिची पाहणी करून कर्मचाऱ्यांनी दोन-तीन दिवसांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आश्वासन दिले आहे.

Share This Article
error: Content is protected !!