उमरखेड ता.प्रतिनिधी/मनोज राहुलवाड
उमरखेड : ढाणकी नगरपंचायत क्षेत्रात असलेली सार्वजनिक विहीर कुठल्याही सुरक्षा जाळीविना मोकळी आहे त्यामुळे येथील जागृत बंटी फुलकोडवार यांनी मुख्याधिकारी यांच्या समक्ष उघड्या असलेल्या विहिरीला सुरक्षा जाळी लावून देण्यासाठी विनंती अर्ज सादर केलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की ढाणकी शहरातील प्रभाग १२ इंदिरा गांधी चौक येथे कुठलेही सुरक्षेचा अभाव असलेली मोकळी सार्वजनिक विहीरअसुन तेथे सर्रास लहान मुलांचा तसेच मोकळे जनावर यांचा वावर आहे. मोकळ्या असलेल्या विहिरी मुळे धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असून अशा प्रकारच्या विहिरीचा गैरवापर सुद्धा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हा संभाव्य धोका विचारात घेऊन ढाणकी शहरातील जागृत ग्रामस्थ बंटी विहिरीवर सुरक्षेसाठी जाळी बसवून देण्यासाठी मुख्याधिकारी नगरपंचायत यांच्याकडे विनंती अर्ज सादर केलेला आहे.