{प्राचार्य कणसे यांचा गर्भगळीत इशारा
शाळा,महाविद्यालयासमोर चिडीमार पथक कार्यान्वित करणे आवश्यक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : जिल्यातील धर्माबाद शहरात शाळा महाविद्यालयासमोर तवाळखोरांची संख्या वाढली असून,त्यामुळे टीव्हीशन, शाळा, कॉलेज ला जा ये करणाऱ्या विद्यार्थीनीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून,विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील शाळा, महाविद्यालयासमोर चिडीमार पथक तयार करुन पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
सद्य स्थितीत धर्माबादच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयासह इतर शाळांमध्ये शाळेंशी अथवा महाविद्यालयाशी कुठलाही संबंध नसताना किंवा काम नसताना अनेक तरुण भटकंती करत असून विद्यार्थिनींना विनाकारण त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या गोष्टीचे गांभीर्य ओळखून नूतन प्राचार्य डॉक्टर कणसे यांनी आपल्या महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांची कसून तपासणी गेल्या सप्ताहापासून चालू केली असून यामध्ये खरोखरच महाविद्यालयांशी कुठलाही संबंध नसताना व महाविद्यालयाच्या कामाचाही गंध नसलेले अनेक तरुण परिसरात वावरत असल्याचे लक्षात आले.
व शहरातील शाळा, कॉलेज रोड, व टिव्हशन ला जाणाऱ्या लगतच्या किराणा दुकान, पान टपरी,चहाचे दुकानावर सध्या या चिडीमारांचे थवेथवे मुदामहून पाहाव्यास मिळत आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
यासंदर्भात यांनी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्याशी चर्चा केली.व बहुतांशी विद्यार्थ्यांना आपल्या भवितव्याची जाणीव करून देत त्यांना समजून सांगत महाविद्यालय परिसरातून बाहेर हाकलून दिले.व यानंतर महाविद्यालयाशी कुठलाही संबंध नसताना किंवा महाविद्यालयाचे कुठलेही कामकाज नसताना महाविद्यालयाच्या परिसरात आढळल्यास एफ आय आर दाखल करण्याचा गर्भगळीत इशारा दिला.व आपल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी वर पालकांनी पण लक्ष ठेवावे यांच्या अँड्रॉइड मोबाईलवर चॅटिंग चेक करावे जेणेकरून आपला पाल्य चुकीच्या मार्गाने तर जात नाही ना याबद्दल पालकांनी शहनिशा करत रहावे असे आवाहनही डॉक्टर कणसे यांनी पालकांना केले.
उपरोक्त पार्श्वभूमीवर चिडीमार पथक स्थापन करून पोलिसांनी संशयित विद्यार्थ्यांची शहनिशा करावी अशी मागणी पालकातून होत आहे.