माहूर येथे गोरक्षकावर पंधरा ते सोळा जणांचा लोखंडी रॉड,दगड,काठ्यांनी मारहाण करत जिवघेणा हल्ला

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

१० आरोपींसह इतर विरोधात जिवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमानुसार माहूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ५ आरोपी अटकेत,

५ आरोपी अटकेत, फरार असलेल्यांची धरपकड सूरु,घटनेच्या निषेधार्थ माहूर बंद;शहरात तणावपूर्ण शांतता

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर : बैलजोडी कुर्बानी साठी घेऊन जात असल्याची माहीती मिळाल्या वरून गोरक्षक सोनु चौधरी व त्याचे मित्र यांनी पायी बैल जोडी नेत असलेल्या ईसमास विचारपुस केली असता चौकात असलेल्या सलिम याने “ईसका बहोत हो रहा है!”असे म्हणत सोबतच्या पंधरा ते सोळा जणांसह सोनु चौधरी वर लोखंडी रॉड,दगड,काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना दि. २९ रोजी सायंकाळी माहूर येथे घडली.

गुरुवार दि,२९ रोजी बकरी ईद दिनी सायं.६.३० वा.माहूर येथील गोरक्षक सोनु चौधरी वय २३ (फ्रेंड्स जीम चालक) व त्याचा मित्र आतिष राठोड वय २५ हे मोटार सायकलने जीम कडे जात असताना सोनूस फोन आला की, दत्तनगर येथील अरविंद जयस्वाल यांच्या घरा समोरून एक इसम पायी बैल जोडी नेत असुन, सदरील बैलजोडी कुर्बानी करीता नेत आहे.
त्यामुळे चौधरी ने त्याचे मित्र मंगेश सूर्यवंशी, कालीदास नैताम, सचिन राठोड यास बोलावून टिपु सुलतान चौकातुन जयस्वाल यांच्या घरा कडे जात असतांना संजय किसन गायकवाड हा दोन बैल घेऊन ईलु चौका कडे येत होता. त्यास विचारपुस केली असता सदरील बैलजोडीचे दाखले सलीम कुरेशी याच्या कडे आहेत;त्याला फोन लाउन बोलावतो असे गायकवाड म्हणाल्याने सोनु चौधरी यांने मंगेश व कालीदास यास पोलीस मदत बोलाविण्या करीता पोलीस स्टेशनला पाठविले.त्यादरम्यान सचिन व सोनू त्याठिकाणी थांबले.त्यावेळी तेथे सलिम कुरेशी,बाबुशा ठेकेदार,आसिफ हसन,सलिम ॲटोवाला,अनिस चिनी ऊर्फ शोयब,शेख एजाज,सोहल शेख,मोईन व ईतर मुस्लीम लोकं तेथे आलीत व “ईसका बहोत हो रहा है, ईसको आज खत्म करेंगे!” असे म्हणून सलीम ॲटोवाला ने सोनू चौधरीच्या डोक्यावर रॉड मारला व इतरांनी त्यांच्या हातातील काठ्यांनी, लाथाबुक्क्यांनी व दगडाने सोनू चौधरी यास जिवे मारण्याच्या उददे्शाने मारहान करत होते. दरम्यान मित्र व पोलीस येतांना दिसताच सर्वांनी तेथून पळ काढला.सोनू चौधरी यास मोठ्या प्रमाणात डोक्यावर मार लागला असून, माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर डोक्याला अधिक मार लागून गंभीर ईजा झाल्याने त्यास त्वरित पुढील उपचारा करीता यवळमाळ येथे हलविण्यात आले आहे.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकुष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरने यांनी रात्रीच माहूर येथे धाव घेत हल्लेखोर पाच जणांना अटक केली आहे.तर अनेक फरार अरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.गोरक्षकावरील या जीवघेण्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून, या घटनेच्या निषेधार्थ दि.३० रोजी माहूर शहर बंद पुकारण्यात आला असून, सोनू चौधरी वर जीवघेणा हल्ला करुन मुख्य आरोपींपैकी फरार झालेल्या सर्व व इतर आरोपींना तातडीने पकडून त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोनू चौधरीचा परिवारासह या गंभीर घटनेमुळे प्रचंड दुखावलेल्या गोरक्षक व तमाम हिंदू संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.सध्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून, मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा माहूर येथे दाखल झाला असुन,सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

दि.२९ रोजी माहूर येथे सोनू चौधरी यास काही आरोपींनी मारहाण केली होती त्याबाबत माहूर पोलिस ठाण्यात 10 आरोपी आणि त्यांच्यासोबत इतर यांच्या विरोधात भादवी 307(जीवे मारण्याचा प्रयत्न), 395( दरोडा) पोलिस आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे.त्यातील महत्वाचे 5 आरोपी आता पर्यंत अटक केलेले आहेत.सर्व माहूर वासियांनी खुप सहकार्य केलेले आहे.असेच सहकार्य करून माहूर शहरात शांतता कायम राहील यासाठी मदत करावी! हे पोलिस प्रशासनातर्फे आवाहन आहे.कोणतीही अफवा पसरू नका.काही आक्षेपार्ह समजले तर तात्काळ पोलिस ठाण्यात संपर्क करावा….
– डॉ.नितिन काशीकर,पोलिस निरीक्षक,माहूर पोलीस ठाणे
———————————————————–

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!