सर्व धर्म एकता संदल समितीची माहिती.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.7.मुदखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले भोकर रोड लगत हजरत गैबि पीर बाबा यांचा संदल आणि उर्स कार्यक्रम 14 आणि 15 सप्टेंबर रोजी संपन्न होणार असल्याचे दिनांक 07 सप्टेंबर रोजी शहरातील स्थानिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सर्वधर्म एकता संदल समारोह सोहळयाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व संदल समारोह सोहळयाचे सर्वच कार्यकारिणीचे सदस्य या वेळी उपस्थित होते.
प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा शहरातील हजरत गैबि पीर बाबा यांचा संदल आणि उर्स कार्यक्रम 14 आणि 15 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती
सर्व धर्म एकता संदल समारोह सोहळा यांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुढे बोलताना सांगितले की संदल आणि उर्स कार्यक्रम दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी ठीक 03.00 वाजता गुजरी येथील गौस पाक यांच्या दर्गाहून निघत पोलीस ठाण्या समोरून भीम नगर येथून पुढे मार्गक्रमण करत. नवी-आबादि होत हजरत गैबि पीर बाबा यांच्या नियोजित दर्गा येथे संध्यकाली ठीक 06.00 वाजता पोहचेल
आणि दिनाक 15 रोजी ऊर्स आयोजित केला जाणारा अशी माहिती या वेळी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष करीम खाँ साहेब, दर्गा येथील मुजावर शेख रशीद मामू ,संदल आणि उर्स कार्यक्रम अध्यक्ष शेख नफीस भाई, उपाध्यक्ष अब्दुल अझीझ भाई मिरचीवालें,सचिव शेख अहेमद नासेर,पत्रकार शेख शमशु भाई,बाबू भाई,जमील फुलारी, गौस मुल्ला, इशहक फुलवाले, अब्दुल रहमान ऑटोवले,अखिल फुलारी,शेख महेबुब आदींची उपस्थिती होती.