कृष्णा अशोकराव जाधव भौतिकशास्राची सेट परिक्षा पात्र

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

कौठा: प्रतिनिधी – प्रभाकर पांडे

कंधार : तालुक्यातील कौठ्याजवळ असलेल्या धानोरा येथील कापड दुकानात काम करणारा अशोक जाधव यांचा मुलगा कृष्णा जाधवने परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा भौतिकशास्रअशा अवघड विषयात M.Sc विशेष प्राविण्यप्राप्त घेवुन काल 28/06/2023 ला लागलेल्या निकालात जनरल आणि EWS प्रवर्गातुन SET पात्र ठरला.
अशोक जाधव यांच्या कष्टाचे मुलाने सोनं केलं. तो M.Sc B.Ed.असुन तो CET, TAIT,आणि GET परिक्षेसोबतच आता SET परिक्षा उत्तिर्ण झाला. त्याला आतापर्यंत एकही परिक्षेत अपयश मिळाले नाही. कृष्णा हा लहानपणापासुनच जिद्दी अभ्यासु मुलगा.
त्यांने मिळवलेल्या यशाबद्दल विचारणा केली असता त्याच्या यशाचे श्रेय त्याचे आईवडील, गुरु आणि त्याचा स्वतःवर असलेला विश्वास याला दिले आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वाकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत असुन गावचे सरपंच प्रतिनिधी संजय हात्ते, उपसरपंच शिवराज पा.जाधव प्रतिष्ठित नागरिक व शिक्षक माधवराव माली पा.जाधव, गणेशराव पा.जाधव, ईश्वरराव पा.जाधव, मोहनराव पा.कदम, निळकंठ पा.हात्ते, संतोष गुरुजी जाधव, ऊत्तमराव पा.जाधव, रावसाहेब पा. शेळगावे, मारोती पा. गव्हाणे,दौलत पा.गोरठे, रंजित पाटील जाधव, कोंडिबा पा.गोरठे, रावसाहेब पा. जाधव, बालासाहेब पा. जाधव ,राहुल सोनकांबळे, नागोराव साहेब नवघरे, सर्व गावकर्‍यांनी व आप्तसौखियांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!