पिम किसानच्या प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांनी ईकेवायसी व आधार संलग्न करुन घ्यावे.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

हिमायतनगर ता.प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड

हिमायतनगर : तालुक्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी ईकेवायसी व आधार संलग्नीत प्रलंबित असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी दिनांक 22 सप्टेंबर 2023 प्रयंत ekyc व आधार संलग्न करुन घ्यावे. आपल्या तालुक्यातील ekyc प्रलंबित असलेली संख्या 2930 असुन व बॅक खाते आधारशी संलग्नित लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 1678 एवढी प्रलंबित असुन वरील सर्व लाभार्थ्यांनी ekyc व बॅक खाते आधार संलग्न करून घ्यावे. आधार संलग्न करून घेण्याचे काम मागील 2 महिन्यापासून सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 व्या हप्त्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी गांव पातळीवर कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी हे गावपातळीवर मोहिम राबवुन ekyc व बॅक खाते आधार संलग्न करण्याचे काम करत आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना वारंवार संपर्क करुनही ekyc किंवा आधार संलग्न करण्यासाठी प्रतिसाद देत नसलेल्या लाभार्थ्यांची नांव वगळयासाठी शासन स्तरावर सुचना प्राप्त आहेत. तरी लाभार्थ्यांनी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी आणि सामाजिक सुविधा केंद्र यांच्या मार्फत किंवा स्वतः ekyc व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता मिळणार नाही. जे लाभार्थी ekyc व बॅक खाते आधार संलग्न करणार नाहीत. त्यांचे नाव या योजनेतुन वगळयात येणार आहे. तरी प्रलंबित लाभार्थ्यांनी यांची काळजी घ्यावी. असे आव्हान तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. चन्ना साहेब व सांख्यिकी अधिकारी एम.एस. काळे साहेब यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!