ढाणकी ते सावळेश्वर रस्त्याची दुरावस्था.

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

पूर्णत्वाचा दिनांक उलटून सात महिने होत आहेत, परंतु रस्ता “जैसे थे” चं.

ढाणकी/ प्रतिनिधी :मनोज राहुलवाड

ढाणकी : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ढाणकी ते सावळेश्वर रस्त्याची सुधारणा करणे हा रस्ता, ४४९.१८ लाख रुपयाचा रस्ता, त्याचा पूर्णत्वाचा दि. २३/१२/२०२२ असताना आज दि. ८/७/२०२३ उजाडले, तरीही रस्ता “जैसे थे” चं परिस्थितीत दिसत आहे. सदर रस्त्यावरून सावळेश्वर वासियांची ये-जा करताना त्रेधा तिरपीट उडत आहे. ढाणकी येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर अक्षरशः खराब रस्त्या अभावी शिक्षणाकरिता यायला जमत नसल्या कारणाने, त्यांच्या शाळा बुडत आहेत. सदर रस्ता एवढा चिखलमय झाला की, जर का सावळेश्वर मधून एखादा सिरीयस पेशंट किंवा एखादी गर्भवती महिला ढाणकी येथे दवाखान्यात आणायचे असल्यास, ढाणकी पर्यंत पोहोचेल का नाही? ही परिस्थिती सध्या तरी गंभीर रूप धारण करीत आहे. यावरून प्रश्न निर्माण होतो की सावळेश्वरला माणसे राहत नाहीत का? काम पूर्णत्वाचा दिनांक उलटून सात महिने होत आहेत, सदर कॉन्ट्रॅक्टदार रस्ता का करीत नसेल? सदर कंत्राटदाराने या रस्त्याचे कागदोपत्री बिल तर उचलले नसेल? म्हणूनच तर पूर्णत्वाचा दिनांक उलटून सात महिने झाले तरी रस्त्याची परिस्थिती खराबच आहे. अशी चर्चा सावळेश्वरवासी नागरिक करताना दिसत आहेत. पुसद येथील नवाब कन्स्ट्रक्शन कंपनी सदर रस्त्याचे कंत्राटदार असून, यावर कार्यकारी अभियंता म.ग्रा.र.वि. संस्था यवतमाळ ही कार्यान्वयन यंत्रणा आहे.
आता पावसाळा सुरू झाला आता तर रस्त्याचं काम होणारच नाही, परंतु चिखलमय झालेल्या रस्त्याचा काहीतरी तोडगा काढून, त्यावर लाल मुरूम टाकल्यास नागरिकांना दळणवळण यंत्रणा सोपी होईल. लाल मुरूमही कंत्राटदार का टाकत नसेल? हा एक यक्ष प्रश्न आ वासून नागरिकांच्या समोर उभा आहे. या आठ ते दहा दिवसात पावसामुळे रस्ता चिखलमय झाला व त्या रस्त्यामुळे, रस्त्यावरून ये-जा करणारे टू व्हीलर वाहनांच्या अपघातात वाढ झाली. अक्षरशः महिला, लहान बाळासहित, मोठी माणसे पडण्याचे प्रमाण वाढले. अजून कुणाचा रस्त्यावर जीव गेल्यावर सदर कंत्राटदाराला व संबंधित अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा सवाल जनता करीत आहे.

 

सदर कंत्राटदाराला आम्ही फायनल नोटीस दिली असून, येत्या चार-आठ दिवसात त्यांनी रस्त्याची सुधारणा केली तर ठीक, अन्यथा त्या कंत्राटदाराचे काम रद्द करण्याची कारवाई आम्ही करू.
व सावळेश्वर येथील नागरिकांचे दळणवळणाची व्यवस्था सुधारण्यासाठी पावसाळ्यामुळे सध्या तरी मुरूम टाकून प्राथमिक स्वरुपात काहीतरी व्यवस्था करू.

तोडे साहेब
कार्यकारी अभियंता, प्र.ग्रा.स.यो. यवतमाळ

जवळपास २०२१ मध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. रस्ता मंजूर झाला म्हणून सावळेश्वरवासीयांना रस्त्याची खूप उत्सुकता होती. परंतु २०२३ चा जुलै उजाडला, अजूनही रस्ता जैसे थे चं परिस्थितीत असल्यामुळे नागरिक हैराण आहेत.
या रस्त्या अभावी ढाणकीहून शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे आणणे तसेच सावळेश्वर मधून लहान मुलांना शिक्षणासाठी ढाणकी ला जाणे आणि ज्या महिला सावळेश्वर मध्ये गर्भवती आहेत त्यांना दवाखान्यात नेण्याची वेळ आल्यास काय करावे ? या मुख्य विवंचनेत सावळेश्वर चा प्रत्येक नागरिक सध्यातरी पडलेला असून, सध्या पावसात या रस्त्यावर अनेक शेतकरी पडून जखमी झाले. सद्यस्थितीत काही शेतकरी दवाखान्यात उपचार सुद्धा घेत आहेत. एवढी दयनीय अवस्था या रस्त्यामुळे सावळेश्वरवासीयांची झालेली आहे. याकडे सरकारने व संबंधित कंत्राटदाराने लक्ष द्यावे. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.

रमेश रावसाहेब रावते
सामान्य नागरीक, सावळेश्वर.

Share This Article
error: Content is protected !!