जामनेर तालुक्यासह परिसरात समाधान कारक पाऊस

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

जामनेर ता.प्र तिनिधी / शिवाजी जाधव

जामनेर : या बाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्या सह परिसरात पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे कधी अस्मानी संकट तर कधी मानव निर्मित संकट शेतकऱ्यांच्या शेतीस जेरीस आणते. परंतु शेतकऱ्यांचा कणा ताठ असुन तो संकटांवर मात करून पुन्हा बाहेर पडतो व शेतीच्या कामांना लागतो. हेच दैवी वरदान शेतकऱ्याला लाभले आहे. यंदाही चांगला पाऊस होईल या आशेने जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरीवर्ग हा पेरणीच्या कामाला लागला कुणी कपाशी तर कुणी सोयाबीन तसेच अन्य पिकांची पेरणी केली. परंतु पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी पेरलेली बियाणे हे उगवली नाही. परत दुबार पेरणीचे संकट उभे ठाकते कि काय अशी का शंका निर्माण झाली होती. पण तुरळक पावसाने हजेरी लावली.तशात चांगला दमदार पाऊस काही पडत नसल्याने पुन्हा तीच चिंता तेच संकट निर्माण झाले. पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा फोल ठरते की काय असे वाटत होते.

गुरुवार दि. ६ रोजी झालेल्या दमदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे शेतातील पिके चांगली वार्यावर डौलत उभी राहतील टप्प्या टप्प्यात पडणार्‍या पावसाने पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल या आशेने शेतकरी सुखावला आहे. गुरुवारी बाजार असल्याने जिल्ह्यासह तालुकाभरातुन खरेदी विक्री साठी छोटे मोठे व्यवसायीक मोठ्या संख्येने आपली दुकाने थाटतात. ऐन बाजार रंगात येण्याच्या वेळीच पावसाने हजेरी लावली. व्यवसायीकांसह इतर नागरीकांची तारांबळ उडाली. आपली थाटलेली दुकाने व प्रतिष्ठाने आवरण्यात व सावरण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. तर बाजारासाठी आलेले नागरिक यांनी सुद्धा पावसातील पाण्यात भिजण्यापासुन दुकानांचा व इतर ठिकाणांचा आश्रय घेतला. आज थोडेसे नुकसान होईल. पण जर शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले. तर शेतीचे उत्पन्न जास्त होईल. शेतकरी हा शेतीवर अवलंबून असल्याने शेतीच उत्पन्नाचे एकमेव साधन आहे . त्यामुळे बाजार पेठा या फुलल्या शिवाय राहणार नाही. यातच छोटे मोठे व्यवसायीक यातच समाधान मानतात. झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Share This Article
error: Content is protected !!