नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव – तालुक्यातील मौजे हुस्सा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रध्वज शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बालाजी आनंदराव पाटील हंबर्डे यांच्या हस्ते फडकविण्यात आला आहे. त्यानंतर शाळेतील चिमुकल्या बालकांचे भाषण कौशल्य स्पर्धा घेऊन त्यांचे प्रथम, द्वितीय,तृतीय,अशा निवडी करून त्यांना बक्षीस देण्यात आले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे भारतीय लोकशाहीमध्ये मोठे स्थान असून . भारत स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान असणाऱ्या महापुरुषांच्या जीवन चरित्रावर व राष्ट्र प्रेमाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या विविध विषयाने विद्यार्थ्याकडून भाषण कौशल्य घेऊन राष्ट्रभक्ती च्या आठवणींना एकंदरीत उजाळा मिळाला आहे. व 2022 – 23 मध्ये इयत्ता दहावी मध्ये सर्व गुणवंत विद्यार्थ्यां यांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला आहे. तर कार्यक्रमादरम्यान जि. प. प्रा. शाळा चे मुख्याध्यापक श्री नारे सर , हुस्सा ग्रामपंचायतचे सरपंच सौ सुलोचनाबाई रमेश हंबर्डे, सहशिक्षक श्री बंडेवार सर, रमेश रामराव हंबर्डे,बालाजी आनंदा हंबर्डे, यशवंतराव गणपतराव पाटील हंबर्डे (पो. पा.), साहेबराव देगावे, अंगणवाडी सेविका सौ. बिनाबाई हंबर्डे, सौ.अश्विनीताई हंबर्डे, सौ.स्वप्नाताई डोईफोडे (ग्रा. पं. ऑपरेटर ), आशा वर्कर सौ मीराबाई चौधरी,सौ गोदावरी पोद्दार, श्री अशोकराव पाटील हंबर्डे,रामदास दशरथ हंबर्डे, मोहनराव हंबर्डे,जयवंत वाघमारे, प्रदीप वाघमारे, किशोर शिवाजी हंबर्डे, कधी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.