मारवाडी तांडा येथील आश्रम शाळा व जुनिअर कॉलेज च्या वतीने सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी….

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव : तालुक्यातील मारवाडी तांडा येथील माध्यमिक आश्रम शाळा व पोस्ट बेसिक जुनियर कॉलेज च्या वतीने आज लोकशाहीर साहित्यरत्न सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे हे लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे लेखण साहित्यातून समाजाला शिकवण देऊन समाजातील अंधश्रद्धेची विषमता दूर करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे केवळ मातंग समाजासाठी नसून ते देशातील आणि जगातील सबंध गोरगरीब शेतकरी समाजाला कादंबरीच्या माध्यमातून जागं करण्याचे काम केले आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचा व त्यांच्या विचारांचा आदर करत जगातील एकूण 23 देशांमध्ये त्याच्या विचारांचं अनुकरण केले जाते म्हणून अण्णाभाऊ यांचे कार्य महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगणने राहिले असल्याने म्हणून अण्णाभाऊ यांची ओळख आहे अण्णाभाऊ हे उपेक्षित कष्टकरी कामगार यांच्या व्यथा लेखणीच्या माध्यमातून देश विदेशापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे. जगाला अतिशय मोलाचा संदेश देऊन विज्ञानवादी परिवर्तनाचे धडे देत अंधश्रद्धे मधून मुक्त करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम हे अण्णाभाऊ यांनी केले आहे हे मानवा तू या जगाचा गुलाम नसून वास्तव या जगाचा तो निर्माता आहेस असेही उद्गार अण्णाभाऊ यांनी काढले आहेत. अण्णाभाऊ यांचे अनेक उदाहरण देत व त्यांचे विविध दाखले देत माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री शेषराव बोईवार सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी ची जीवन गाथा सांगितले आहेत. या अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे संचालक श्री के आर सर, डॉक्टर श्री मधुकर जी राठोड सर,मुख्याध्यापक श्री बोईवार सर, श्री बावणे सर, श्री बन सर, श्री वाघमारे सर, व अन्य प्राध्यापक वृंद, व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!