जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हुस्सा येथील शाळेच्या वरंड्यातील फारशी ची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

 नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे.

 नायगाव – तालुक्यातील मौजे हुस्सा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा च्या वरंडातील फरशी गावातील एका अज्ञात व्यक्तीने दारूच्या नशेमध्ये दगडाने ठेचून फोडल्याची धोकादायक बाब पुढे आली आहे.

       सदर जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वच्छता व सुव्यवस्था आणि शाळेतील लहान बालकाकरिता व विद्यार्थ्याकरिता सोयीस्कर शाळा व मैदान ठेवण्याकरिता शासनाने लाखो रुपयाचा निधी देऊन गेल्या तीन ते साडेतीन वर्षाच्या पूर्वी या वरंडातील फरशीचे काम करण्यात आले आहे. मात्र गावातील काही अज्ञात व्यक्तीने दारू पिऊन शाळेच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालत असल्याचे माहिती काही गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. आणि सदर घटना दिनांक 9/ 8/ 2024 रोजी गावातील काही अज्ञात व्यक्तीकडून दारूच्या नशेमध्ये शाळेच्या किचन वरील पत्र देखील काढण्याचा प्रयत्न केला आहे.

           आणि पत्र काढून घरी नेण्याच्या मानसिकतेतून हा प्रकार केल्याचे दिसून आले आहे. मात्र पत्रा न निघाल्याने किचन रूमवरील पत्रा शाबूत राहण्याचे दिसून आली आहे. मात्र शाळेच्या मैदानावरील घाण कचऱ्याचे व घाण सांडपाण्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य मागल्याने त्यामुळे डासांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. आणि या विषारी डासामुळे लहान बालकासह विद्यार्थ्यांना जीवाला धोका निर्माण होण्याची देखील शक्यता गावातील पालकाकडून सांगण्यात आली आहे. म्हणून याकडे संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे. आणि शाळेच्या चौ बाजूने सीमा सुरक्षा भित बांधण्याची देखील गरज आहे त्याकरिता शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी देखील मागणी आता होताना दिसून येत आहे. शाळेच्या वर्हांड्यातील फरशी पडलेल्या अज्ञात व्यक्तींचा लवकरात लवकर तपास लावून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी गावातील पालकांच्या वतीने मागणी करण्यात अली आहे.

Share This Article
error: Content is protected !!