राहेर येथे द्वारकाधीश क्लिनिक च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव ता. प्रतिनिधी/अशोक वाघमारे

नायगाव : तालुक्यातील राहेर येथे दि.23 .07. 2023 रोजी ,राहेर परिसरातील सुपरिचित गेल्या 24 वर्षापासून 24 तास सेवा देणारे डॉ. शरद हंबर्डे यांच्या विनंतीनुसार भक्ती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल घमोडीयाफॅक्टरी डॉक्टर लेन नांदेड यांच्यातर्फे आयोजन झाले.
अ. भा. छा. संघटना जिल्हाध्यक्ष मा. माधवराव जी ताटे साहेब व अ. भा. छा. स. डॉ.सेल श्री रामानंद हंबर्डे यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
शिबिराचा लाभ राहेर व परिसरातील गावे हर्नाळा, तोरणा ,कुंभारगाव, दुगाव, हुस्सा, कोळगाव, खपराळा ,कागठी ,गुजरी, येल्लापूर इत्यादी गावातील 300 रुग्णांनी लाभ घेतला.
रुग्णाची तपासणी डॉ.माया मैदपवाड व डॉ.अलमपल्लेवाड यांनी केली. शिबिरात दमा , छातीरोग ,हृदयरोग, अस्थिविषयक,वात रोग, जुनाट आजार इत्यादी आजारावर तपासणी व उपचार करण्यात आले.
डॉ. शरद हंबर्डे, व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी, रत्नाकर हंबर्डे, राहुल राठोड, राजेश सुर्वे, कोमल कांबळे, अविनाश कानोले, तुकाराम कळसे, किशन डुमणे, राजेश कांबळे, दत्ता नरवाडे इत्यादी आरोग्य कर्मचारी शिबिरासाठी सेवा केली. मोफत आरोग्य शिबिर झाल्यामुळे राहेर व परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले.

Share This Article
error: Content is protected !!