शेतकऱ्यांना दिवस-रात्र विजपुरवठा करावा.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

शिवसेना ठाकरे गटाची मागणी.

उमरखेड ता.प्रतिनीधी /मनोज राहुलवाड

उमरखेड: महिण्याभरापासून पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थीती मध्ये ज्या शेतक-यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतक-यांना सुध्दा महावितरणच्या मनमानी कारभारामुळे आपल्या पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. ढाणकी परिसरात महावितरण कंपनीने शेतक-याला पुरवण्यात येणा-या, विजपुरवठा ची वेळ कमी केल्याने पाणी असुनही विज नसल्याने, आपली पिके डोळयादेखत मरताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ढाणकी परिसरात शेतक-यांना फक्त काही तासचं वेळ, पाणी देण्याकरीता मिळत असल्याने, त्यांना पुर्ण शेतीचे क्षेत्र सुद्धा भिजवणे होत नाही. आधीच आसमानी संकट आणि त्यात कंपनीचे सुलतानी जुलुम, यामुळे मरावे की जगावे अशी स्थिती शेतकऱ्यांपुढे उभी आहे. आपला अन्नदाता महावितरणच्या नाकर्तेपणामुळे पिसुन जात असून, त्यांना आपले पिके वाचवण्याची सुरळीत आणि जादा वेळ विज पुरवठयाची गरज आहे. तेव्हा आपण जो सहा तासाचा वेळ शेतक-यांना दिला आहे, तो वाढवुण दयावा. जेणे करून ज्या शेतक-यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, त्यांना तरी आपली पिके वाचवता येईल. जर आपल्या कडुन या निवेदणाचा कोणताही सकारात्मक विचार झाला नाही तर, आम्हाला शेतक-यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख संजय कुंभरवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड ,ढाणकी शहर प्रमुख बंटी जाधव ,युवासेना तालुका अध्यक्ष संभाजी गोरटकर, गणेश नरवाडे , एजास पटेल ,गजानन आजेगावकर ,अशोक कोरटवार ,विशाल नरवाडे गजानन धोपटे ,बजरंग चव्हाण ,रमेश चिंचोलकर सुंदरकांत वासमवार ,अविनाश पानपटे यासह शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी महावितरण ला दिला.

Share This Article
error: Content is protected !!