मेघ राजाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांची झाली दैना….

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी/अशोकवाघमारे
नायगाव : तालुक्यासह बिलोली उमरी धर्माबाद तालुक्यात मेघराजाने दांडी मारल्याने पावसाअभावी शेतकऱ्यांचे झाले नुकसान जून महिना उलटून जुलै महिना लागून तबल तीन दिवस झाले असून देखील पावसाने डोळे झाकून बसल्याने शेतकऱ्यांची पेरणी लांबनीवर गेले असता शेतकरी चिंताजनक असल्याचे चित्र दिसून येत आहेत शेतातील मशागतीचे कामे वेळोवेळी झाले असता देखील पावसाने मात्र दांडी मारल्याने हवालदिन झाल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे शेतकरी कर्जबाजारी होऊन महागडे बी भरण घरात आणले असून वेळेवर पेरणी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे नायगाव धर्माबाद उमरी बिलोली या तालुक्यात पाऊस झाले नसल्याने शेतातील कामे जशाला तसेच असल्याचे दिसून येत आहे. या तालुक्यात अक्षरशा जनावराला देखील खाण्यासाठी चारा मिळत नसून जनावरांची मोठी चारा खाण्यासाठी धडपड होत असल्याची चित्र दिसून येत आहे.
येरे येरे पावसा तुला देतो पैसा अशी म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आल्याचे दिसून येत आहे.म्हणून यापुढे शेतकऱ्यांनी करायचे तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!