पाऊस न पडल्याने मरवाळी तांडा येथील एका शेतकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर पाणी वाहून घातले शेतातील कापसाला पाणी…..

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव : तालुक्यातील नरसी सर्कल अंतर्गत येणाऱ्या मरवाडी तांडा येथील एका शेतकऱ्यांनी अख्ख डोक्यावर पाणी वाहून घातले शेतातील कापसाला पाणी पावसाने शेतकऱ्यांच्या आईन पेरणीच्या वेळी दांडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्या साठी मागे पुढे पहात असल्याची चर्चा दिसून येत आहे त्याचे कारण असे की, पावसाने जून व जुलै च्या महिन्यात पाणी पडत नसल्याने महागडे बी बियाणे पावसाअभावी पेरले असता तर त्यांचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याकारणाने काही शेतकरी पेरणी करण्याऐवजी पावसाची वाट पाहत बसले आहेत तर काहींनी म्हणजेच गावातील व तंड्यावरील 75 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी करून अक्षरशः आभाळाकडे डोळे टौकारात बसल्याचे चित्र एकंदरीत दिसून येत आहेत.
मारवाडी तांडा हे माळरानावर असल्याकारणाने शेतकऱ्यांनी 75 टक्के पेरणी करून घरातील बियाणे शेतात टाकून काही शेतातील बियाणे जमिनीतच कोमजून गेल्याची एकंदरीत खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था करून शेती भिजवण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहेत. यात कापूस लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून यासाठी पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकरी हवालदिन झाल्याचे दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!