कुंटूर मंडळ परिसरात ढगफुटीमुळे सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान….

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगाग ता.प्रतिनिधी/अशोक वाघमारे

नायगाव : तालुक्यातील कुंटूर मंडळ परिसरात सर्वत्र ठिकाणी ढगफुटीमुळे सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने व नदी नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कुंटूर मंडळातील राहेर हुस्सा धनंजय मेळगाव सालेगाव डोंगरगाव आवराळा कोठाळा गावांना महापुरांचा फटका बसल्या असल्याने या गावातील शेतकऱ्यांची शेती ही खरबडून गेल्याचे चित्र दिसून येत आहे काही शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. कुंटूर मंडळात सततच्या पावसामुळे नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत सततच्या पावसामुळे लोकांचे जण जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर ढगफुटीमुळे कुंटूर मंडळातील एकंदरीत पाहता शेकडो हेक्टर जमिनींचे अतोनात नुकसान झाले असून येथील परिस्थिती अवाक्य बाहेर गेल्याचे दिसून येत आहे या ढगफुटीमुळे कुंटूर मंडळात पडतीच्या पाण्याने थैमान घातले असल्याने येथील नागरिकांचे व कष्टकरी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान शेकडो एकर शेती ही पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिन झाल्याचे दिसून येत आहे.
सदर ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने व नदी नाल्यांना महापूर आल्याने शेतकरी व येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. या सदृश्य स्थिती मुळे कुंटूर मंडळातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून यामुळे शाळकरी विद्यार्थी व शेतकरी व्यापारी यांना अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. सततच्या पावसामुळे अनेक गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी गेल्याचे दृश्य पहायला मिळत आहे. म्हणून याकडे संबंधित अधिकारी व आमदार खासदार लक्ष देतील का अशा अपेक्षा आता येथील नागरिकाकडून होताना दिसून येत आहे. सदर कुंटूर मंडळातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान असून शासनाने त्वरित शेतकऱ्यांचे शेतातील पंचनामे करून त्यांना भरभरून मदत करण्यात यावे असे अशा व्यक्त शेतकऱ्याकडून होताना दिसून येत आहे.
एकंदरीत पाहता कुंटूर मंडळातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली व खरडून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. या सततच्या पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याने जमिनीत पाणी ही पाण्यात जमीन असे काही आगळे वेगळे चित्र येथे पाहायला मिळत आहे. म्हणून यावर शासनाने त्वरित लक्ष घालून पंचनामे करून जास्तीची मदत करण्यात यावी अशी शेतकऱ्याकडून अपेक्षा होताना दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!