पुराच्या पाण्यामुळे चिलपिंपरी – महाटी पुलांचे बेभान अवस्था

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

मुदखेड प्रतिनिधी/राहुल कोलते

मुदखेड दि.२८ गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पावसामुळे मुदखेड तालुक्यात पावसाची नोंद २८.६० झाली आहे. या पावसामुळे बऱ्याच गावाचा संपर्क तुटलेला आहे. या मध्ये चिलपिंपरी, टाकळी, खुजडा, हंगेरगा ईळेगाव, भायेगाव, रहाटी, दरेगाववाडी, मनुर या गावांचा समावेश आहे. सतत मुसळधार पावसामुळे चिलपिंपरी- महाटी फुलांची बेभान अवस्था झालेली आहे. पुराच्या पाण्यामुळे फुलांच्या दोन्हीही बाजू वाहून गेल्या आहेत. दोन महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यांचे काम एवढ्या निकृष्ट दर्जाचे केले असून गुत्तेदारांनी बोगस काम केल्या आहे असे गावकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता तात्काळ रस्त्यांचे काम दुरुस्त करून द्यावे अन्यथा यांचे परिणाम या अगोदर अनेक मोठ्या नेत्यांनी भोगलेले आहेत. तुम्हालाही भोगावे लागतील हे लक्षात घेऊन तात्काळ रस्त्यांची गुत्तेदाराकडून करून द्यावे. माळकौठा ते धर्माबाद रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे या भागातील अनेक गावांची रहदारी याचं रस्त्याने होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!